Posts

मेरा आशियाना

बिछड़ने लगे हैं रास्ते,
मंजिल के रूबरू होने से पहले ही ।
कुछ निगाहें आज भी बैठी हैं,
उस इन्तेजार में,
चल बनालू मै आशियाना,
इन चलते लम्हे में ही कही....!!

टूट न जा इस दर्द से,
रख हिम्मत खुद पर ।
तेरा मुकद्दर ही तेरा आशियाना होगा,
ऐसे सोचती होगी तेरी तक़दीर भी,
काश तू संभल पाए इन लम्हों में
कुछ देर और ही सही ।।

रोहित सूर्यवंशी, नाशिक 9767717036

ओळखीची वाट अन अनोळखी सोबत

सगळ कस घडून येत कधी कधी
आपण निवडलेली प्रत्येक वाट ,
गंतव्याला पोहचवेलच? या साठी चा संभ्रम..
अपेक्षान्नी खचून गेल्यावर सावरण्याची तयारी...

अगदी मनात या बद्दल चालणार द्वंद्व ...

या थाऱ्यावर नसणाऱ्या,
 मनाला संभाळेल अशी "संभावना"

नक्की संभावना च ?
की अजुन काय...?

पण यावेळी ती,
ओळखीच्या वाटेवर अनोळखी होती
आणि
त्या वाटेवर असणारी,
 "कुणी अनोळखी" त्याची नवी ओळख ...


- रोहित सूर्यवंशी
9767717036

Bluetooth

अस म्हणतात ना कि
सगळच काही आयुष्यात सोबत नसत;
काही क्षणिक असल,
तरी मनात घर करुन जात...
मग,
अगदी bluetooth सारखं नातं होत त्यांच्...
जवळ असली की paired व्हायचं,
दूर गेल की भावनांची sending failed दाखवायचं..


रोहित सूर्यवंशी, नाशिक. 9767717036

पत्र

एक पत्र,
मनातलं सगळं साठलेलं कागदावर उतरवलेलं...

पहिल्या भेटि पासून, भावना व्यक्त झाल्याच्या प्रतिक्रियेने भरलेलं...

सगळ्या घटना अधोरेखित केलेलं,
अन तेव्हढ्याच कल्पकतेने ते मांडलेलं...

पण एक खंत..
शेवटच्या पानावर लिहिलेलं ते,
तिथपर्यंत च सीमित राहिलं...
भावनांच्या प्रेशकाला, त्याचा प्रति कधी गवसलाच नाही...

-रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036Justice for asifa

जगण्याचा अर्थ ही कळला नव्हता,
त्या चिमुकलीला;
तोच जीवन संपलं...
खेळण्या बागडण्याच्या वयात,
मृत्युला कवटाळलं...
ह्या विकृतींनी आज,
मंदिर ही अपवित्र केली;
या धर्माच्या विळख्यात,
न्याय व्यवस्थाही गुदमराली...


- रोहित सूर्यवंशी , नाशिक  9767717036

निरोप समारंभ

क्षण हा निरोप घेण्याचा,
आठवणींची शिदोरी सोबत नेण्याचा....

साक्षी बनण्याचा त्या वेळेचा,
परिचयाच्या पहिल्या ओळीपासुन सुरु झालेल्या मैत्रीचा...
काहींशी काळानुरूप झालेल्या तिढ्याचा...

आवाज द्या जुन्या दिवसांना,
जोडून घ्या  तुटलेल्या नात्यांना...

पुढे तुमच्या वागण्यात ही काही अंशी मी असेल..
तुमच्या आयुष्याच्या टेबल वर एक फ़ाइल माझी ही असेल...
आरोपंच्या FIR असतील त्यात...
कधी भांडलो  काही बोललो, EGO ही धड़कले असावेत बहुदा...
पण जेव्हा पडलो,
तेव्हाही सांभाळण्यास मदतीला आलेला हात ही तुमचाच होता...

कधी ढूंडालून बघा या क्षणांना,
काही चुकलं याची जाणीव झाल्यावर
" काय करू" या प्रश्ना पासून जरा लांब च रहा..

कारण हे क्षण मूल्यवान असतात,
हे क्षण ना तुमच्या साठी थांबतात ना माझ्यासाठी...
पण एकदा निघुन गेले की कायम चे आयुष्याला जोडलेले असतात...

माझ्या आयुष्यातल्या पुस्तकात,
तुमच्या एक कवितेच पान आहेच
सदैव आठवणीत राहील,
अस ह्रदयात तुमच स्थान आहे.

कारण हा क्षण निरोप घेण्याचा,
आठवणींची शिदोरी सोबत नेण्याचा....


- रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036

प्रेम म्हणजे काय असतं ?

प्रेम म्हणजे काय असतं ?
कुणा साठी पहाटे पडलेलं, सुंदर स्वप्न असतं,
धुक्याच्या दुलईत नटलेलं, प्रसन्न गांव असतं...

प्रेम म्हणजे काय असतं ?
नदीचे दोन किनारे होऊन,
अडथळे पार करीत ,
जीवनाच्या प्रवाहाला मार्गस्थ करनं असतं....

हे प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
Chalk नि dustur मधलं नातं असतं...
आयुष्याच्या पाटीवर,
झालेल्या चुका सुधारणं असतं..

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
पाण्यात विरघरलेल्या, साखरे सारखं असतं...
एक जीव झालेल ते,  संपूर्ण आयुष्य गोड़ करत..

प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
अधूरं असलं तरी त्यात, रममाण होऊन जगणं असतं,
आठवणीत सुद्धा, कागदाची कविता होण असतं...

व्याख्या वेगळी असली तरी,
प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं same नसतं..


रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036